मोदी-भाजपाच्या विरोधात प्रचार करा - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 March 2019

मोदी-भाजपाच्या विरोधात प्रचार करा - राज ठाकरे


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसे मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. एअर स्ट्राईकची खोटी माहिती पसरवली जाते आहे आणि खोट्या फोटोंच्या आधारे प्रचार केला जातो आहे. खोट्या प्रचाराला भुलू नका. मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस असून त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका, नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन लोकांमुळे देश सद्धा धोक्यात असल्याची घणाघाती टीका करत राज ठाकरेंनी निवडणुकीत मोदी आणि भाजपविरोधात प्रचार करणार असल्याचे सांगितले.

राज ठाकरेंनी सांगितले की, मी कोणाकडे निवडणुकासाठी जागा मागयला गेलो नाही, मला निवडणूक लढवण्यात काहीही रस नाही. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे हे मी मागच्या गुढीपाडव्यालाच बोललो होतो. ही लोकसभा निवडणूक मोदी, शाह यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे. माझ्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कोण? हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मोदीविरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचे आहे ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचे असल्याचेेही आवाहन कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी केले.

भाजपवाल्यांनी मे भी चौकीदार चालू केले आहे. ही निवडणूक भारताची आहे की नेपाळची?, ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही. ही निवडणूक मोदी – शहा विरुद्ध देश अशी आहे. त्यामुळे मनसेने भाजपला मतदान करु नये. याने कोणाचाही फायदा झाला तरी चालेल असे वक्तव्य केले. त्यांनी मोदी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना वाईट म्हणतात, स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात पण, प्रधान सेवक हा शब्दच नेहरुंचा आहे. असे म्हणत इतका खोटारडा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad