Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात सर्वाधिक २५०४ मतदान केंद्र मावळ मतदारसंघात

मुंबई दि. 3: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात एकूण 2 हजार 504 मतदान केंद्र उभारण्यात येतील. ती राज्यात सर्वाधिक आहेत. मावळनंतर ठाणे, बारामती, रामटेक आणि बीडमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असतील. ठाणे मतदारसंघात 2,452, बारामती मतदारसंघात 2,372, रामटेक मतदारसंघात 2,364 आणि बीड मतदारसंघात 2,325 मतदान केंद्र उभारण्यात येतील. 

10 मतदारसंघात 2,100 हून अधिक मतदान केंद्र - सातारा (2 हजार 296), शिरुर (2 हजार 296), यवतमाळ-वाशिम (2 हजार 206),चंद्रपूर (2 हजार 193), भंडारा (2 हजार 184), रायगड (2 हजार 179), परभणी (2 हजार 174), पालघर (अनुसूचित जमातीसाठी राखीव) (2 हजार 170), कोल्हापूर (2 हजार 148), उस्मानाबाद (2 हजार 127) या दहा मतदारसंघात 2,100 हून अधिक मतदान केंद्र असतील. सातारा आणि शिरुर मतदारसंघात सारखेच म्हणजेच 2 हजार 296 मतदान केंद्र असतील.

सर्वांत कमी मतदान केंद्र मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात - मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 1,572 मतदान केंद्र असतील. मुंबई दक्षिण मतदारसंघात 1 हजार 578 मतदान केंद्र, मुंबई उत्तर मतदारसंघात 1 हजार 715 मतदान केंद्र असतील. उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात समान म्हणजे 1 हजार 721 मतदान केंद्रे असतील.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 97 हजार 640 मतदान केंद्र असतील. यामध्ये ग्रामीण भागात 56 हजार 227 मतदान केंद्र असतील. तर शहरी भागात 41 हजार 413 मतदान केंद्र असतील.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom