Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई, दि. 4 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 14 मतदारसंघात 197 उमेदवारांनी तर आजपर्यंत एकूण 393 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. चौथ्या टप्प्यासाठी आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यात मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 14 (आजपर्यंत 22 उमेदवार), रावेर-9 (16), जालना-18 (39),औरंगाबाद 16 (42), रायगड 15 (27), पुणे-34 (47), बारामती-18 (31),अहमदनगर- 19 (31), माढा-12 (41), सांगली-11 (21), सातारा 3 (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग-6 (13), कोल्हापूर 9 (26) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी तर आजपर्यंत 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. उद्या दि. 5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे.

चौथ्या टप्प्यासाठी आज 16 नामनिर्देशनपत्रे दाखल -
चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 25 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. दिंडोरी मतदारसंघात आज एक (1), नाशिक 1 (4), पालघर 2 (3), भिवंडी 1 (1), कल्याण 2 (2), ठाणे 1 (1), मुंबई उत्तर (1), मुंबई उत्तर-पूर्व 1 (1), मुंबई उत्तर-मध्य 1 (2), मुंबई दक्षिण-मध्य 1 (1), मुंबई दक्षिण 1 (3), मावळ 1 (1), शिरुर 2 (2), शिर्डी 1 (2). चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी10 एप्रिल रोजी होणार असून 12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom