तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल


मुंबई, दि. 5 एप्रिल - मुंबई उपनगर जिल्ह्यात आज 8 नामनिर्देशन पत्र सादर झाले. मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून विलास विठ्ठल हिवाळे (मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - रेड फ्लॅग) यांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तुकाराम गणपत सोनकांबळे (अपक्ष), चंद्रशेखर शर्मा (भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी) यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून आज राजेश भावसार (भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी), मोहम्मद याहिया सिद्दीकी (अपक्ष), पूनम वेजडल्ला राव उर्फ पूनम महाजन (भारतीय जनता पार्टी), अक्षय कचरू सानप (महाराष्ट्र क्रांती सेना) यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. राकेश विश्वनाथ अरोरा यांनी (अपक्ष व भारतीय क्रांतिकारी सेना) दोन नामनिर्देशन पत्र सादर केली. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघात आज कुणीही नामनिर्देशन पत्र सादर केले नाही.