
प्रकाश आंबेडकर यांनी याआधी जुन्या नोटा चलनात आणू असे आश्वासन दिले आहे. पुलवामाबद्दल बोलू नका, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. मात्र आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार घटनेनं दिला असताना अशा पद्धतीनं का रोखलं जातं, असा सवाल आंबेडकरांनी यवतमाळमध्ये रॅलीला विचारला. आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं. दरम्यान या प्रकरणाकडे निवडणूक अधिका-यांनी जातीने लक्ष घातले असून, आयोगाने महाराष्ट्र भारिप महासंघाच्या कार्यालयाला नोटीस पाठवली आहे.