...तर ब्रिटिशांना पुन्हा बोलवावे लागेल - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2019

...तर ब्रिटिशांना पुन्हा बोलवावे लागेल - प्रकाश आंबेडकर


मुंबई - "लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर कोण देश चालवणार, असा सर्वत्र सध्या अपप्रचार सुरू आहे. मी म्हणतो, सव्वाशे कोटींच्या देशात पंतप्रधान होण्यालायक एकही व्यक्ती नसेल तर पुन्हा ब्रिटिशांना बोलवावे लागेल," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, "भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा विचार, आर्थिक धोरणे, सामाजिक प्रश्न एकसारखे असून हे दोघे एकत्र आले तर मुस्लिमांना आपले तोंड बडवावे लागेल. मोदी सरकारने जनतेची दिशाभूल करत नोटबंदी व त्यानंतर नोट बदलणे हा देशाच्या काळ्या अर्थव्यवस्थेला लुटणारा निर्णय घेतला. अशा डाकू, लुटारू पंतप्रधानाला व सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेवर आणू नका." 

भाजपाने पाच वर्षांत देश डबघाईला नेला असून जीएसटी व नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. निवडणुकीच्या प्रचारात पुलवामा हल्ल्याचे राजकारण पंतप्रधान मोदी करतात. मात्र पाकिस्तानवर हल्ला करायला 14 दिवस का लावले याचे उत्तर मोदींकडे नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीतून पराभव दिसत असल्याने त्यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून ज्या पक्षाच्या सेनापतीमध्ये निवडून येण्याचा आत्मविश्वास नाही, तिथे त्यांचे सैनिक काय निवडून येणार. राहुल गांधी हा पळपुटेपणा बारामतीकडून शिकले असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

Post Bottom Ad