स्थापत्य शहर व उपनगर अध्यक्षपदी सेनाच

मुंबई - मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकानंतर गुरुवारी स्थापत्य शहर व उपनगर अध्यक्ष पदाची निवडणूका पार पडल्या. या दोन्ही समित्यांवर सेनेच्याच अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. स्थापत्य शहर अध्यक्ष पदी प्रिती पाटणकर व उपाध्यक्षपदी दत्ता नरवणकर तसेच उपनगर समितीच्या अध्यक्ष पदी उपेंद्र सावंत व उपाध्यक्ष पदी दिनेश कुबल यांची बिनविरोध निवड झाली असून शुक्रवारी बाजार, उद्यान,आरोग्य, विधी व महिला बालकल्याण समिती अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान १७ प्रभाग समित्यांची निवडणूक येत्या ८, ९ व १२ एप्रिलला होणार आहेत. आठ प्रभाग समित्यांच्या निवडणुका ८ एप्रिलला तर पुढील ८ प्रभाग समित्यांच्या निवडणुका ९ एप्रिलला व एका प्रभाग समित्यांची निवडणूक १२ एप्रिलला होणार आहे. 
Tags