जनता दलाचा संजय दिना पाटील यांना पाठिंबा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2019

जनता दलाचा संजय दिना पाटील यांना पाठिंबा


मुंबई - माजी पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दलाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रभाकर नारकर व कार्याध्यक्ष सलीम भाटी यांनी ईशान्य मुंबईचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसे जनता दलाने पात्र दिले असून आपले कार्यकर्ते संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरवले आहेत.  

मुंबईत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्या विजयासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र सर्व मतदारांची भेट घेऊन संजय दिना पाटील यांना मतदान करण्याची विनंती करत आहे. जनता दल देशपातळीवर भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी काम करत असून ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीने सक्षम व प्रामाणिक व गेली पन्नास वर्ष जनसेवेत काम केलेल्या पाटील घराण्यासाठी संजय दिना पाटील यांना उमेदवारी देवून “मतदारांवर प्रचंड” प्रभाव टाकलेला आहे व ईशान्य मुंबईत या वेळेला पक्षभेद बाजुला ठेवून संजय दिना पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करत आहेत असे प्रभाकर नारकर यांनी म्हटले आहे.

भाजपवर मतदार नाराज -
केंद्र आणि राज्य सरकारवर मतदार खुश नसल्याने तसेच सरकारकडून नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्याने भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईच्या मतदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कोटक यांच्या पदयात्रा आणि रॅलीमध्ये अनेक ठिकाणी त्यांना मतदारांच्या विरोधाला समोरे जावे लागले आहे. मतदारांच्या रोषापुढे खासदार किरीट सोमैय्या, प्रवीण छेडा, मनोज कोटक यांनी नागरिकांना सामोरे न जात त्याठिकाणहून निघून जाणे पसंद केले आहे. 

Post Bottom Ad