Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

व्हीजेटीआय मधील ३०० विद्यार्थी १८ तास अभ्यास करुन करणार बाबासाहेबांना अभिवादन


मुंबई – वीरमाता जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट( VJTI) मधील ३०० हून अधिक विद्यार्थी भारतरत्न डॉ.  यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. शनिवारी सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत विद्यालयाच्या डॉ. बा. आ. ग्रंथालयमध्ये सलग १८ तास हे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १२८ व्या जयंती निमित्त विनम्रता अभिवादन करण्यात येणार आहे. VJTI चे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सलग तिसऱ्या वर्षी १८ तास अभ्यास अभियान राबवत आहेत. विद्यार्थ्यांना १८ तासादरम्यान नाश्ता आणि जेवण जागेवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाविद्यालयाकडून ग्रंथालयातून विविध पुस्तके मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राध्यापक व इतर स्वयंसेवकही १८ तास अभ्यास काळात अभ्यासकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत. सहभागी विद्यार्थीनींना शेवटच्या लोकलने घरी जाणे शक्य व्हावे, यासाठी सुविधा असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे कार्य असून त्यांना खरे अभिवादन हे अभ्यासातून देणे योग्य ठरेल. १८ तास बाबासाहेब अभ्यास करायचे. विद्यार्थ्यांमध्येही याच प्रकारे बाबासाहेबांकडे असणारे अभ्यासाचे गुण उतरावेत विद्यार्थ्यांनामध्येही एकाग्रता यावी. त्यांना ते किती अभ्यास करू शकतात याची मर्यादा कळावी. युवा पिढी मोबाईलपासून लांब राहवू शकतात हे सर्वांना कळावे, यासाठी आम्ही हे अभियान राबवतो, असे प्राध्यापक डॉ. वा. भि. निकम यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom