Type Here to Get Search Results !

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


नवी दिल्ली - अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणावर आज (१० मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणी १५ ऑगस्टपर्यंत त्रिसदस्यीय मध्यस्थता समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी घेण्यात आली.

न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय मध्यस्थांची समिती नेमली होती. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू हे समितीचे सदस्य आहेत. या समितीला ८ आठवड्याच्या आत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच कोणतीही माहिती माध्यमांना देऊ नये अशी ताकीददेखील देण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत या अहवालात कोणती माहिती दिली गेली आहे याची कल्पना कोणालाही नाही.Tags

Top Post Ad

Below Post Ad