भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमी - राम माधव - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

07 May 2019

भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमी - राम माधव

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांपर्यंत सर्वच जण भाजपला बहुमत मिळण्याचा दावा करत असले तरी भाजपचे नेते राम माधव यांनी मात्र भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भाजपला बहुमत मिळणार नसलं तरी एनडीएला मात्र बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच भाजपला २७१ जागा मिळाल्या तरी आम्हाला आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राम माधव यांनी 'ब्लूमबर्ग'ला दिलेल्या एका मुलाखतीत हे मत व्यक्त केलं. उत्तर भारतातील ज्या राज्यात २०१४मध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. त्या राज्यात यावेळी भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. तर पूर्वेकडील राज्य आणि ओडिशा तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होईल. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर मित्रपक्षांशी मदत घ्यावी लागेल, असं माधव यांनी सांगितलं. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here