Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सोहा अली खान यांनी ५ व्या इंस्पायर पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढविली.

मुंबई - जोंधळे एडुकेशनल ग्रुपचा विभाग 'एस्ट्रोवर्ल्ड एक्झिबिशन' हा गेल्या ७५ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अभिन्न आहे. एस्ट्रोवर्ल्ड एक्झिबिशनची सुरुवात सिराज सागर जोंधळे, एंजेल कार्ड रीडर आणि सायकिक हिलर यांनी केली आहे - गेल्या 5 वर्षांपासून इंस्पायर - एक आध्यात्मिक, समग्र आणि निरोगी दृष्टीकोन बाळगत या पुरस्काराचे आयोजन करीत आहेत. 

जेके बँकवेट्स, वरळी येथे या पुरस्कार सोहळ्याची पाचवी आवृत्ती पार पडली. प्रख्यात अभिनेत्री सोहा अली खान च्या हस्ते यावर्षीच्या इंस्पायर पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षणतज्ञ डी वाय पाटील,अंबाडण्या एंटरटेनमेंट च्या मॅनेजिंग डायरेक्टर गीतांजली राव आणि सीइओ प्रभाकर शेट्टी हि ह्या प्रतिष्ठित पुरकर सोहळ्यात उपस्थित होत्या. यापूर्वीच्या इंस्पायर पुरस्कार सोहळ्यास महेश मांजरेकर, दिव्या दत्ता, रिमी सेन, मानिनी डे मिश्रा ह्यांसारख्या अनेक प्रतिभावंत कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती.

एस्ट्रोवर्ल्डच्या सर्वेसर्वा सिराज जोंधले यांनी व्यक्त होताना सांगतात की,'एस्ट्रोवर्ल्ड एक्झिबिशन'चे आयोजन करण्याच्या हेतूने अध्यात्मिक आणि समग्र समुदायातील आणि लोकांना एकत्र आणून, त्यांना अध्यात्म आणि समग्र विज्ञान, पर्यायी औषधे आणि उपचारांची जागरुकता मार्गदर्शन करून त्यांना योग्य तज्ञांशी जोडणे आणि जनतेच्या जीवनात अर्थपूर्ण परिवर्तन आणणे व हे अंतर भरणे हा आहे."

मंचावर सन्मानित झालेल्या अनेक पुरस्कृत विजेत्यांपैकी लेखक-दिग्दर्शक-जीवन प्रशिक्षक अनुशा श्रीनिवासन अय्यर म्हणाल्या की, "जीवन प्रशिक्षक म्हणून सामुदायिक कामासाठी पुरस्कृत होणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्माननीय बाब आहे. मी त्या प्रत्येकास धन्यवाद करते ज्यांनी त्यांच्या समुदायात एखाद्याच्या जीवनात सुधारआणण्यासाठी मदत केली आहे."

प्रख्यात वास्तुशास्त्र आणि वास्तुविशारद बसंत आर. रासीवासिया यांना वास्तु विज्ञान विषयातील योगदानाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. ते म्हणाले, "वास्तु एक जटील विषय आहे. एखाद्या व्यक्तीसाठी काय चांगले आहे आणि काय चांगले नाही हे अचूकपणे वर्णन करणे ह्याकरता आपल्या प्राचीन विज्ञानांवर समग्र ज्ञान असणे आवश्यक आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मला अभिमान वाटतो. "

भारतातील भव्य आणि लोकप्रिय स्पिरिचुल, होलिस्टिक, वेलनेस-जागृत प्रचलित एक्झिबिशनने मुंबईमध्ये ११ आवृत्त्या पूर्ण केल्या असून, यावर्षी लवकरच दिल्ली, बंगलोर, जयपूर आणि चेन्नई समेत इतर शहरांमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत.

सिराज शेवटी म्हणतात की, "जगात फक्त एकच व्यवसाय आहे आणि तो म्हणजे मानवी कल्याण. आमच्याबरोबर यात सामील व्हा जेणेकरून आम्ही आमचा समुदाय वाढवू शकू. "

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom