महापालिकेच्या अध्यापक विद्यालयात रॅगिंगविरोधी पथक उभारा

मुंबई - मुंबई महापालिकेच्या अध्यापक विद्यालयात रॅगिंगविरोधी पथकाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण समिती सदस्या प्रा. आरती पुगावकर-खुळे यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामधील टोपीवाला महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी (वय 23) या विद्यार्थिनीने रॅगिंग आणि जातीयवाचक जाचाला कंटाळून बुधवारी (22 मे) आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या डी. एड. महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी पथकाची स्थापना करून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करावी, अशी मागणी आरती पुगावकर-खुळे यांनी केली. मुंबई महापालिकेची दोन अध्यापक महाविद्यालये असून त्यामध्ये 146 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये अधिकाधिक महिला विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अध्यापक महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी पथकाची स्थापना करण्याची मागणी पुगावकर यांनी केली आहे.
Previous Post Next Post