Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भाजपा आघाडीचा ३५० जागांवर विजय निश्चित


मुंबई - 'प्रखर राष्ट्रवाद', 'राष्ट्ररक्षण', 'हिंदुत्वाचा मान' आणि 'नवभारत निर्माण' या मुद्द्यांना शत्रे बनवून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या नरेंद्र मोदींनी काँग्रेससह सर्व विरोधकांना धूळ चारत सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. पूर्ण बहुमतासह सत्तेवर परतणारे मोदी तिसरे आणि पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी ही कामगिरी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीच केली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेले निकाल आणि कल यांच्यावरून भाजपच्या ३००सह एनडीए ३५०च्या आसपास जागा जिंकेल हे स्पष्ट झाले आहे. 

लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागी झालेल्या मतदानाची मोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आणि सुरुवातीचे कल हाती येताच ६८ वर्षीय नरेंद्र मोदी सन २०१४च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा पंतप्रधान बनणार हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, एग्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कितीतरी भरीव कामगिरी भाजपप्रणित एनडीएने केली असून, अनेक वर्षांनंतर एग्झिट पोलचे अंदाजही खरे ठरले आहेत. काँग्रेस आणि मित्रपक्षांना शंभरी गाठणेही अशक्य होऊन त्यांची घोडदौड नव्वदीपर्यंतच आटोपेल, असे रात्री उशिरापर्यंतचे कौल सांगत होते. मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीची वैयक्तिक कामगिरीही अफाट आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी या आपल्या मतदारसंघातून मोदींनी गेल्यावेळचा विक्रम मोडत तब्बल साडेचार लाखांचे तर, गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून लढणाऱ्या अमित शहांनी साडेपाच लाखांचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला. मात्र, मोदींनी थेट आव्हान देणाऱ्या राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमधील अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघही राखता आला नाही. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा तेथे पराभव केला. केरळच्या वायनाड मतदारसंघाने राहुल यांना हात देणे आणि सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ राखणे हाच काय तो काँग्रेससाठी दिलासा ठरला.

मोदींविरोधात जबरदस्त आघाडी उघडणाऱ्या ममता बॅनर्जी यांना तर भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का दिला. सन २०१४मध्ये पश्चिम बंगालमध्ये फक्त दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने राज्यात ४२पैकी १९ जागांवर मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला २३ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. एकेकाळी राज्यात अनभिषिक्त सत्ता भोगणाऱ्या डाव्यांना तर भोपळाही फोडता आला नसून, त्यांचे अस्तित्वच संपले आहे. ओडिशातही मुसंडी मारत भाजपने २१पैकी सहा जागी आघाडी घेतली असून, सत्ताधारी बिजू जनता दलास १५ जागा मिळणार आहेत. सन २०१४मध्ये भाजपकडे फक्त एक जागा होती.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom