मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलिसांचे २१ कोटी थकवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 May 2019

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलिसांचे २१ कोटी थकवले

मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबईत गेल्या ७ वर्षापासून झालेल्या विविध क्रिकेट सामन्यातील पोलीस बंदोबस्तासाठीचे तब्बल २१ कोटी ३४ लाख रुपयांचे शुल्क थकवले आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांना पुरविण्यात आलेल्या बंदोबस्ताचे दर शासनाकडून अद्याप निश्चित केलेले नाही. त्यामुळे या सामन्यांचे बील बनविण्यात आलेले नाही. अशी माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १ जानेवारी २०११ पासून मुंबईतील क्रिकेट सामन्यासाठी पुरविण्यात आलेला बंदोबस्त व शुल्काची माहिती मागविली होती. त्याबाबत बंदोबस्त शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये २६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी कालावधीत महिला वर्ल्ड कप स्पर्धाच्या सामन्याचे शुल्क ६ कोटी ६६ लाख २२०८८ रुपये इतके होते. व्याजासह ही रक्कम १० कोटी ५५ लाख ३२,१९७ रुपये इतकी झाली आहे. २५, ३० व ३१ आॅक्टोंबर २०१५ मध्ये झालेल्या एक दिवसीय सामन्याचे बंदोबस्तापोटी ८३ लाख ५२ हजार ८९ रुपये शुल्क झाले होते. व्याजासह ती रक्कम आता १ कोटी १२ लाख २६,१६४ इतकी झाली आहे. ८ ते १२ डिसेंबर २०१६ या कालावधीतील कसोटी सामन्याचे ५० लाखाचे शुल्क आता व्याजसह ५५ लाख १८,३४४ इतके झाले आहे. २२ आॅक्टोबर २०१७ च्या एक दिवसीय सामन्याचे ६६ लाखाचे भाडे व्याजासह ७३ लाख ९८,६४१ इतके झाले आहे. त्याच वर्षातील २४ डिसेंबरला झालेल्या टेव्टी-२० सामन्याचे शुल्क व्याजासह ७२ लाख ७९,२५० इतके झाले आहे. २०१७ मधी, एप्रिल व मे महिन्यात झालेल्या आयपीएल सामान्याचे बंदोबस्तासाठीच्या ४ कोटी ६२ लाखापैकी अद्याप ६६ लाखाची थकबाकी आहे. व्याजासह ही रक्कम ७६ लाख ८४,७१० इतकी झाली आहे. २०१६ विश्वचषक टी-२० क्रिकेट सामन्याचे ३ कोटी ६० लाख शुल्क व्याजासह ४ कोटी ६२ लाख ४०३९९ इतकी झाली आहे. २०१८ वर्षातील आयपीएल सामन्याचे एकूण ४ कोटी ९० लाखा पैकी अद्याप १ कोटी ४० लाख बाकी असून व्याजासह ही रक्कम १ कोटी ४८ लाख ८६,६६७ इतकी झाली आहे. गेल्यावर्षी २९ आॅक्टोबरला झालेल्या एकदिवसीय सामन्याचे ७५ लाखाची थकबाकी व्याजासह ७६ लाख ७८,१२५ इतकी झाली आहे.

Post Bottom Ad