डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण - आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी


मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहेर हिला मंगळवारी (२८मे) संध्याकाळी पहिली अटक झाली. दरम्यान, या तिन्ही आरोपींना आज (२९ मे) मुंबई सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. दरम्यान, सत्र न्यायालयाने ही तिन्ही आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. या तिन्ही आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला होता. मात्र, या तिघीही फरार होत्या. पायल यांच्या मृत्यू नंतर अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी नायर रुग्णालयासमोर आंदोलन केली आहेत. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्या पायलच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पायलच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या तीनही डॉक्टरांना पोलिसांनी पकडून न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर तीनही आरोपीना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 
Tags