Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षणानंतर पेढे वाटणारे नेते कुठे गेले - राज ठाकरे


मुंबई - ऐन निवडणुकीत सरकारविरोधात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर ज्या भाजपाच्या नेत्यांनी पेढे वाटले होते ते आता कुठे गेले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  

यावेळी बोलताना, आरक्षणाच्या नावावर सरकारने फक्त तरुणांना-तरुणींना झुलवत ठेवले, आताही ते आंदोलन करत आहेत, मग मराठा आरक्षण मिळाल्यानंतर ज्या भाजपाच्या नेत्यांनी पेढे वाटले होते ते आता कुठे गेले, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तर आरक्षणाच्या विषय विचारत आरक्षणाच्या विषयावर सरकारने फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. आधीच्या सरकारवर आरोप करत भाजप नेते सत्तेवर आले आणि आता जेव्हा सत्ता हातात आहे तेव्हा सिंचनावर यांनी काय काम केले? 29 हजार गावांमध्ये दुष्काळ कसा? हे आणि असेच प्रश्न मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विचारले, मुख्यमंत्री या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांना देश प्रेमाची प्रमाणपत्रे वाटायची काय गरज ? - 
देश म्हणजे काय थट्टा आहे का? अशी टीका देखील राज यांनी मोदींवर केली. तसेच नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही. त्यांनी देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटायची गरज नाही आणि नवाज शरीफला केक भरवताना त्यांनी ठरवायला हवे होते देशभक्त कोण? देशद्रोही कोण? असे सांगत मोदींनी धार्मिक आणि जातीय तेढ कितीही निर्माण केली तरी जनता सुज्ञ असते, आता ते जनतेची दिशाभूल नाही करू शकत नसल्याचे राज म्हणालेत. तसेच दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवादी हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन नसतो. दहशतवादाला आणि दहशतवाद्याला तिथल्या-तिथे ठेचलं पाहिजे असे देखील राज म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad