Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पोलिसांना धमकावणाऱ्या तोतया पोलिसाला बेड्या


मुंबई - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत वाहतूक पोलिसांना धमकावणाऱ्या एका तोतयाला साकीनाका वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बेड्या ठोकण्यात यश आले आहे. भीमबहादूरसिंग धनसिंग (५०) असे त्या तोतयाचे नाव आहे. सध्या या तोतयाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस नाईक मनोहर भुसारे हे टोईंग व्हॅनसह अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते. भुसारे यांनी एका हिरानंदानी परिसरात स्कुटीवर कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असल्याचे सांगत धनसिंगने आपले ओळखपत्र वाहतूक पोलिसांना दाखवले. दंडाची रक्कम भरल्यानंतर धनसिंगने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्वाच शिवीगाळ सुरू केली. यावर भुसारे यांनी त्यांना शिवीगाळ न करता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत सकपाळ यांना भेटण्यास सांगितले. साकीनाका येथील वाहतूक पोलीस चौकीत जाऊन त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत संकपाळ यांची भेट घेतली. त्यावर संकपाळ यांनी त्यांना त्याच्या वरिष्ठांकडे तक्रार करावी, असा सल्ला दिला.

तोतया धनसिंगने वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी संकपाळ यांना आपणदेखील पोलीस खात्याचा अधिकारी असल्याचे सांगत 'अँटी करप्शन अँड अँटिक्राईम विंग ऑफ इंडिया' या नावाचे ओळखपत्र दाखवले. यावर भारताची राजमुद्रा आणि या तोतयाची माहिती होती. तसेच त्यावर गृहखाते आणि पंतप्रधान कार्यालय यांचा उल्लेख होता. पंतप्रधान कार्यालयाने आपल्यास ओळखपत्र दिल्याचे त्याने सांगितले. तेव्हा संकपाळ यांना त्या इसमास पोलीस खात्याची कोणतीही माहिती नसल्याचे तसेच हे ओळखपत्र बोगस असून तो इसम तोतया असल्याचा संशय आला. त्यांनी याची माहिती ताबडतोब पवई पोलिसांनी दिल्यानंतर त्या इसमास ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom