किरण दिघांवकर यांच्यासह पाच सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 June 2019

किरण दिघांवकर यांच्यासह पाच सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या


मुंबई - मुंबई महापालिकेने ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघांवकर यांची जी उत्तर विभागात बदली करण्यात आली. त्यांच्यासोबत पाच प्रभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. दोन अभियंत्याकडे सहाय्यक विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असून ६ जून रोजी बदलीचे अद्यादेश काढले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी आजपासूनच बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश महापालिका सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

महापालिकेच्या २४ प्रभाग कार्यालयापैकी ए विभागाच्या सहाय्यक आयुक्त (रुग्णालये) अलका ससाणे यांची बदली सहाय्यक आयुक्त ई विभागात बदली केली. तर ई विभागाचे अतिरिक्त भार असलेले प्रभारी सहाय्यक नितीन रमेश आर्ते यांची ए विभाग कार्यालयाचे किरण दिघांवकर यांच्या जागी बदली केली. किरण दिघांवकर यांना जी उत्तरची जबाबदारी सोपवली आहे. जी उत्तर विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांची एच पूर्व विभागात तर एच पूर्व विभागाचे गजानन बेल्लाळ यांची एफ उत्तर विभागात बदली केली. एच उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्यावर मालमत्ता विभागाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंत्यांची पूर्णकालिन कार्यभार भत्तावर नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांचे वेतन त्या विभागातील सहाय्यक आयुक्तच्या रिक्त पदावर न आकरता. ते सध्या कार्यरत असलेल्या आस्थापनेवर कार्यकारी अभियंता पदावर आकारण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Top Ad

test