Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बुधवारीही जोरदार पावसाची शक्यता

मुंबई - उन्हाच्या कडाक्याने घामाने चिंब झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. सोमवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्यानंतर मंगळवारीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारीही शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळून ‘वायू’ चक्रीवादळ जाणार असल्याने मुंबईत अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घामाघूम झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सांताक्रुझमध्ये ४० मिलिमीटर तर कुलाब्यामध्ये २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरांत २३ झाडे कोसळली. सहा ठिकाणी पाणी साचल्याने पालिकेने सहा पंप लावून पाण्याचा निचरा केला. कांदिवली पश्चिमेला विजेचा शॅाक लागून लागून दोघांना जीव गमवावा लागला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळून ‘वायू’ चक्रीवादळ जाणार असल्याने दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले. 

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळ १५ किलोमीटर प्रतितास वेगाने कारवार आणि गोवा किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. हे ‘वायू’ चक्रीवादळ पुढे सरकरत जाईल, तशी त्याची तीव्रताही वाढत जाणार असून संध्याकाळपर्यंत त्याचे तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळात रूपांतर होईल. वातावरणही अंशत: ढगाळ राहणार असल्याचे मत ‘स्कायमेट’ या संस्थेने वर्तवले आहे. ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे त्यापुढील २ ते ३ दिवसांत मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. यावेळी दिवसा हवेतील आर्द्रता वाढणार आहे. सद्याच्या मान्सून पूर्व पावसानंतर पुढील काही दिवसांत मुंबईत मान्सून धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण व रात्री विजांच्या कडकडासह मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान, सोमवारी पडलेल्या पावसामुळे मंगळवारी वाढत्या तापमानात घट होऊन चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom