पवईतील बांगुर्डा तलावांत बुडालेल्या दोन तरूणांचा मृत्यू

Anonymous

मुंबई -- पवई येथील बांगुर्डा तलावांत बुधवारी दोन तरूण बुडाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा पोलीस व अग्निशमन दलाने शोध घेऊन बुधवारी एकाला व गुरुवारी दुस-याला बाहेर काढले; मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. 

बांगुर्डा तलावांत बुधवारी दोघेजण पोहायला उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेजण बुडाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन या दोघांचा शोध घेतला असता बुधावारी रात्री अजय बोट (१८) याचा शोध लागला मात्र त्याला नजीकच्या होलिस्पिरीट रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. तर दुसरी व्यक्ती चैतन्य धिरंगे (३१) याला तलावातून गुरुवारी दुपारी बाहेर काढून मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले असता त्यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. पवईच्या मोरारजी नगरजवळच हा बांगुर्डा तलाव आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात हा तलाव असून त्यात हे तरुण बुडाले. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.
Tags