Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोहिनूर स्क्वेअर प्रकरण - राज ठाकरे यांना ईडीची नोटीस


मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मागे ईडीची चौकशी लावली जाईल अशी चर्चा महाराष्ट्रात होती. ही चर्चा खरी ठरली आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून येत्या गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. दरम्यान सरकारने सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. 

काय आहे प्रकरण - 
सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर आयएलएफएसला मोठं नुकसान झालं होतं. त्या प्रकरणाचा ईडीने आता तपास सुरू केला असून याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूरसाठी जागा खरेदी घेतली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्यानंतर आयएलएफएसचं मोठं नुकसान झालं होतं. पुढे २००८मध्ये राज यांनी शेअर्स विकून या कंपनीतून अंग काढून घेतले होते. मात्र त्यानंतरही राज या कंपनीत सक्रिय राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. 

रस्त्यावर उतरू - मनसेचा इशारा 
राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचं जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार हे सूडाचं राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत आहे. 
- संदिप देशपांडे, सरचिटणीस मनसे 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom