मेट्रोची कामे पूर्ण झाल्याशिवाय खड्ड्यातून सुटका नाही - आदित्य ठाकरे

JPN NEWS

ठाणे : शहरात जोपर्यंत कामे सुरु आहेत तोपर्यंत खड्डे पडणारच, अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली असून आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाची बाजू घेतली आहे. शहरात खड्डे पडले आहेत, हे जरी खरे असले तरी शहरात कामे सुरु आहेत. कामे सुरु असली तर अडचणी निर्माण होत असतात, कारण रस्त्यावर कामे सुरु आहेत. त्या ठिकाणावरुन मोठी वाहने जात असतात, त्याला तुम्ही काहीच करु शकत नाहीत, त्यामुळे जोपर्यंत कामे पूर्ण होत नाही. तो रस्ता ठिक होणार नाही. कामे पूर्ण झाली की रस्तेही चांगले होतील, असे मत त्यांनी व्यक्त केली आहे .

ठाण्यात गुरुवारी ते वनस्थळी उद्यानाचा लोकार्पण सोहळा, आगरी कोळी भवन भुमिपजन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण आणि गायमुख घाट भुमीपुजन सोहळ्याच्या निमित्ताने ते आले होते, यावेळी पत्रकारांनी त्यांना शहरातील खड्यांवरुन छेडले असता त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आ. प्रताप सरनाईक आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या घडीला जनआशिर्वाद यात्रा महत्वाची नसून आमचे सर्व लक्ष हे कोल्हापूर आणि सांगली या भागांकडे असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी पूर ओसरला तरी तेथील साफसफाई आणि त्यांना मदत पोहचविणो गरजेचे आहे, त्याला आम्ही अधिक महत्व देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !