अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी भाजपाची संस्कृती जपावी

JPN NEWS
मुंबई - सदैव देशाच्या हिताचे काम करायचे आणि पक्षाच्या वाढीचा विचार करायचा, ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती असून त्यामुळे भाजपा ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे. श्रद्धेय अटलजी ही संस्कृती जगले आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे वागणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे भावपूर्ण उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत काढले.

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व आ. डॉ. रामदास आंबटकर, आ. राज पुरोहित, मराठवाडा विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सदैव देशहितासाठी काम करणे आणि पक्षविस्ताराचा विचार करणे यामुळेच भाजपा वेगळा पक्ष आहे. हीच पक्षाची संस्कृती आहे. हा विचार अटलजी – अडवाणीजींनी आचरणात आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह हाच विचार जगत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या विचाराने आचरण करणे हीच अटलजींना योग्य आदरांजली आहे.

त्यांनी सांगितले की, विद्वत्ता, नम्रता, प्रश्नांचा अभ्यास आणि कार्यकर्त्यांबद्दल आत्मियता हे अटलजींचे वैशिष्ट्य होते. त्यांनी देशभर प्रवास करून कार्यकर्त्यांना प्रेरित केले. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्तारासाठी देशभर प्रवास केला. असंख्य अडचणींवर मात करून त्यांनी संघटन केले. भाजपाचा पाया बळकट करून पक्षाला यशस्वी करण्यात अटलजी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे योगदान आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !