ऍडमिशन नाही म्हणून सीबीएसई, आयसीएसई शिक्षकांना पुरस्कारातून डावलले का - महापौर

JPN NEWS
मुंबई - महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या ‘महापौर शिक्षक’ पुरस्कारमध्ये यंदा मराठी शिक्षकांचा बोलबाला राहिला आहे. एकूण ५० पुरस्कारांपैकी ३० मराठी, हिंदी ६, उर्दू ९, गुजराती ३, इंग्रजी, तमीळ, कन्नड भाषिकांमधील प्रत्येकी १ शिक्षकांचा यात समावेश आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. दरम्यान, सीबीएसई, आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधील शिक्षकांचा यंदा या पुरस्कारांमध्ये समावेश न केल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. तुमची ऍडमिशन त्या शाळांमध्ये केली जात नाहीत म्हणून त्या शाळांमधील शिक्षकांना महापौर पुरस्कारातून वगळले का असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. तसेच याची चौकशी करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. 

दरवर्षी देण्यात येणार्‍या महापौर पुरस्कारांची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात आज केली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक उपस्थित होते. शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणार्‍या यापुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारांसाठी १५० शिक्षकांची तोंडी परिक्षा घेण्यात आली. सलग तीन दिवस मुलाखत घेऊन ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अंतिम निवडीत २९ महिलांनी तर २१ पुरुषांनी पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे ३० मराठी शिक्षकांची यात निवड केली आहे. महापालिकेकडून त्यांना सन्मानचिन्ह, सुवर्णपदक आणि प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहे. मुलुंडमधील कालीदास नाट्यगृहात सोमवारी (ता. ११ सप्टेंबर) पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 

अध्यापन पध्दत, विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेचा दर्जा, शिष्यवृत्ती परिक्षा, शिक्षणक्षेत्रातील बदल, १० वर्षे निष्कलंक सेवा, पटनोंदणी व गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांसाठी केलेले लेखन कार्य, गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी विभागातील मुलांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यात सहभाग आहे. शिक्षणक्षेत्रातील नामवंत, शिक्षण समिती अध्यक्षांसह पाच जणांची समिती नेमली होती. या समितीने शिक्षकांचे गुणदान करुन निवड केल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !