महाजनादेश यात्रेचा नुसताच थाट, जनतेत मात्र शुकशुकाट

JPN NEWS

मुंबई दि. 31 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेवर मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा लईच थाट जनतेत मात्र शुकशुकाट काळ्या कुत्र्याने देखील बदलली वाट अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे करत एक व्हिडिओदेखील ट्विटवरून शेअर केला आहे.

बीड येथे झालेल्या भाजपाच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या सभेला काळ कुत्रही येत नाही अशी टीका केली होती. याच टीकेला चोख प्रत्युत्तर देत आज धनंजय मुंडे यांनी नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेकडे जनतेने कशी पाठ फिरवली आहे याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

यहा पे सब शांती शांती है असं स्लोगनही त्यांनी या व्हिडिओ साठी वापरले आहे. खरोखरच सुनसान असलेल्या रस्त्यावरून कुत्रे देखील या जनादेश यात्रेला सामोरे जाताना दिसत नाही. सुनसान रस्त्यावरून जाताना मुख्यमंत्री मात्र हात हलवत व अभिवादन करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

ट्विटवरून धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा लईच थाट जनतेत मात्र शुकशुकाट काळ्या कुत्र्याने देखील बदलली वाट अशी पूराव्यासह निर्भत्सना करत आपल्यावर झालेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !