दहिहंडी - सुरक्षिततेसाठी ४० हजार पोलिसांचा ताफा सज्ज

Anonymous

मुंबई - यंदाच्या दहिहंडी उत्सवावर घातपाताची शक्यता वर्तविण्यात आल्याने पोलिसांनी मुंबईच्या सुरक्षेत वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ४० हजारांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. राज्य राखीव दल, श्वान पथक, बॉम्बनाशक पथकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देशात विविध कारकांनी सध्या वातावरण तापले आहे. जम्मु काश्‍मिरमधील ३७० कलम काढून घेतल्याने, घातपाताची शक्‍यता आहे. तर राज्यातील विधानसभा निवडणुकां जवळ आल्याने, धमाका करण्यास नक्षलवादी संघटना सरसावल्या आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षितेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत. दहिहंडी उत्सवात मोठी गर्दी होत असते. गर्दीच्या ठिकाणे दशहतवादी संघटना आणि समाजकंटकांच्या रडारवर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षितेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत. मुंबई पोलिसांनी त्यानुसार चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील विविध ठिकाणी ४० हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत. तसेच ज्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथकेही यावेळी सज्ज असतील. महिला आणि तरूणींशी होणाऱ्या छेडछाडीवर देखील पोलिसांची बारीक नजर असेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास त्यांची महिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Tags