Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

डॉ. पायल तडवी प्रकरण - तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन

मुंबई: डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. जामीनावर सुटलेल्या आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई करतानाच, त्यांनी दिवसाआड न्यायालयासमोर हजेरी लावावी, असे निर्देशही दिले आहेत. या दरम्यान आरोपी डॉक्टरांना नायर रुग्णालय किंवा आग्रीपाडामध्ये जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (वय २८), डॉ. अंकिता खंडेलवाल (वय २७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

२३ जुलै रोजी न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जुलैपर्यंत तहकूब केली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी न्यायालयानं सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली होती. न्यायालयात आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीनावर सुटलेल्या आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई करतानाच, त्यांनी दिवसाआड न्यायालयासमोर हजेरी लावावी, असे निर्देशही दिले आहेत. या दरम्यान आरोपी डॉक्टरांना नायर रुग्णालय किंवा आग्रीपाडामध्ये जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom