पोस्टमनसाठी फिटनेस मंत्र सत्राचे आयोजन

Anonymous

मुंबई - लहानपणापासूनच पोस्टमन आपल्या हातात पत्र घेऊन किंवा खांद्यावर मोठी पार्सल घेऊन एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तिकडे, एका ठिकाणाहून दूस-या ठिकाणापर्यन्त आनंद पसरवतो. पोस्टमन हा डाक विभागाचा समोरचा चेहरा आणि टपाल विभागाचा राजदूत असून कर्तव्याच्या वेळी दर सेकंदाला स्वत:चा एक क्षणही विचार न करता, आपले कर्तव्य करीत असतो. तथापि, पोस्टमनच्या कामाचे स्वरूप, ताणतणाव, तणाव आणि खाण्याच्या प्रतिकूल सवयींचा विचार केल्यास पोस्टमन कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा आलेख प्रभावित होतो. पोस्टमनमध्ये निरोगी खाण्याची सवय लावण्यासाठी मुंबई विभागाकडून मुंबई जीपीओच्या द्वि-शताब्दी हॉलमध्ये फिटनेस मंत्र सत्र आयोजित केले गेले. 

एशियन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या न्यूट्रिशन अवॉर्ड विजेत्या आणि देशाच्या आरोग्य आणि निरोगीपणाबद्दल देशातील प्रमुख वक्त्या रुजूता दिवेकर यांनी या सत्राला संबोधित केले. सदर सत्रादरम्यान त्यांनी पोस्टमनला निरोगी शरीर आणि मन राखण्यासाठी पारंपारिक आहार पध्दति आणि आधुनिक पौष्टिक विज्ञानाच्या मिश्रणावर त्यांनी भर दिला.“स्थानिक खा, जागतिक विचार करा”. या मंत्राच्या माध्यमातून हे उत्तम प्रतिबिंबित होते. अधिवेशनात मुंबई विभागातील संपूर्ण टपाल कुटुंब उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट पोस्टमनमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते. या सत्राचा शेवटी पोस्टमन कर्मचा-याचा चेह-यावर आनंद आणि डोळ्यात सकारात्मक चमक दिसून आली.
Tags