डोंबिवलीत मनसेची ईव्हीएम हंडी

JPN NEWSडोंबिवली - डोंबिवलीच्या मानपाडा चौकात दरवर्षी मनसेची दहीहंडी मोठ्या जल्लोषात फुटते. यंदा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असल्याने मनसेने दहीहंडीला होणारा कार्यक्रम यंदा रद्द करून पूरग्रस्तांना २ लाख ५१ हजार रुपयांची मदत पाठवली आहे. मात्र प्रतिकात्मक ईव्हीएम हंडी उभारण्यात आली होती. पोलिसांनी मनाई करूनही मनसेने हंडी बांधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जप्त केली. यावरून मनसे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या झटापटीत मनसैनिकांनी ईव्हीएमची हंडी फोडली.

मनसे ईव्हीएम दहीहंडी फोडणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे राजेश कदम यांना नोटीस बजावली होती, मात्र तरी सुध्दा हंडी फोडणार असल्याचा इशारा मनसेने दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. मनसैनिक मानपाडा चौकात जमण्यास सुरूवात झाली. ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा असे टी शर्ट परिधान करून मनसैनिक हंडी फोडण्यासाठी मानपाडा चौकात जमले. त्यांनी ईव्हीएम हंडीचे विधीवत पूजन केले. त्यानंतर पोलिसांनी ही करवाई केली. मनसैनिक आणि पेालीस यांच्या झटापट झाली. मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मोदी सरकारला कंसाची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, तसाच आम्ही ‘कृष्णकुंज’चे गोपी आणि गोपिका मोदी सरकाररुपी कंसाचा निषेध करत असल्याचे कदम यांनी सांगितले. मनसेने ‘EVM हटवा, लोकशाही वाचवा’ हा नारा देऊन आंदोलन सुरू केले आहे. त्याची एक प्रतिकात्मक EVM ची दहीहंडी मनसेचे पदाधिकारी साजरी करत आहे. त्यातून ‘कृष्णकुंज’चे गोपी आणि गोपिका दही आणि लोणी लाटणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !