Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकास आराखड्यास मान्यता


मुंबई - नागपूरच्या कामठी येथील ओगावा सोसायटीच्या प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल व परिसराच्या विकास आराखड्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ड्रॅगन पॅलेसचा जागतिक स्तरावरील बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे आंतरराष्ट्रीय शांती, मैत्री व मानव कल्याणकारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या टेम्पलचे व्यवस्थापन ओगावा सोसायटीद्वारे करण्यात येते. त्यांच्यामार्फत या परिसरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क, पर्यटन सुविधा आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राची स्थापना करण्यासाठी एकूण 214 कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांसाठी 30 कोटी 42 लाख आणि निवास व्यवस्थेसाठी 44 कोटी 74 लाख असा एकूण 75 कोटी 17 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी लागणारा निधी पुरवणी मागणीद्वारे विशेष घटक योजनेतून अतिरिक्त नियतव्यय म्हणून मंजूर करण्यात येईल. या प्रकल्पासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर या वास्तूची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ओगावा सोसायटीची राहणार असून त्यासाठी येणारा आवर्ती खर्च या सोसायटीस करावा लागणार आहे. या प्रकल्पाची मालकी सोसायटीसह राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची राहणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom