राज ठाकरे ईडी चौकशी - मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

JPN NEWS

मुंबई - कोहिनूर मिल खरेदी प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आठवडाभरापूर्वी ईडीने चौकशीसाठी नोटिस बजावली. त्यानंतर राज्यभरातल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये सरकारविरोधात वातावरण तापले आहे. गुरुवारी राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. सकाळी मनसेचे चिटणीस संदीप देशपांडे व संतोष धुरी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नोटिसा बजावत महत्वाच्या ठिकाणी जमावबंदी करून कार्यकर्त्यांचा अटकाव करण्यात आला. त्यामुळे दिवसभर वातावरणही तणावाचे होते. 

ईडी कार्यालयात चौकशीसाठी राज ठाकरे सकाळी ११ वाजता हजर राहणार होते. या पार्श्वभूमीवर कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जमा होण्याची शक्यता होती. ईडी कार्यालयाच्या परिसरातही कार्येकर्ते जमण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन जमावबंदी लागू केली. काही मनसैनिक इडियट हिटलर लिहिलेले टी-शर्ट परिधान करून सरकारच्या निषेधाच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून जमाव बंदी लागू केली. सीएसटी, चर्चगेट, दादर, अशा रेल्वे स्थानक व काही परिसरात कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. कार्यकर्त्यांना नोटिस पाठवून पोलिसांनी सकाळपासूनच धरपकड सुरु केली. मनसेचे संदीप देशपांडे यांनी इडियट हिटलर लिहिलेले ब्लॅक टी-शर्ट परिधान केले होते. यामुळेही वाद उफाळून येऊ शकतो, त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे समजते. मनसेच्या कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव मनसैनिकांच्या नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. संदीप देशपांडे यांना सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. यांच्यासह मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, अविनाश जाधव आणि मनसे नेता संतोष धुरी, नितीन नांदगावकर, यशंवंत किल्लेदार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी कोणतेही आंदोलन न करता शांतता राखावी, कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन केले होते. मात्र ईडीच्या कार्यालयात जाताना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी याची खबरदारी घेतल्याचे समजते. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !