Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोहिनूर स्क्वेअर गैरव्यवहार : राज ठाकरेंची ईडी चौकशी, मनसे नेत्यांची धरपकड

मुंबई : कोहिनूर खरेदी कथित गैरव्यवहार प्रकरणी आज राज ठाकरेंची अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) कार्यालयात चौकशी होत आहे. आज सकाळी ११.०० वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या कारवाई विरोधात बंद आणि इतर पद्धतीने निषेध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र राज ठाकरेंनी शांतता बाळगण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलंय. या पार्श्वभूमीवर मुंबईत काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अगोदरच मनसे नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आलीय. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

कोहिनूर स्केअरप्रकरणी राज ठाकरेंच्या चौकशीवर लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी आज उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी करण्यात येणार नाही. या दोघांची पुढील चौकशी सोमवारी करण्यात येणार आहे. उन्मेष जोशींची सलग तीन दिवस तर राजन शिरोडकरांची दोन दिवस सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. शिरोडकर राज ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. सलग तीन दिवस उन्मेष जोशींची चौकशी करण्यात आली. शिरोडकरांकडे कोहिनूरसंदर्भातल्या काही कागदपत्रांची मागणी ईडीनं केलीय. तर राज ठाकरे आणि आपले व्यवहारिक संबंध 2008 पर्यंतच होते आणि त्याच्यानंतर आपला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहारिक संबंध नाही असं त्यांनी सांगितलंय.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom