Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

हेलिकॉप्टरमधून शिरोळला आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा


कोल्हापूर, दि. 11 : शिरोळमधील खिद्रापूर, राजापूर, कनवाड, नृसिंहवाडी या गावात आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या आहेत. 1 लाख 20 हजार डिझेल, पेट्रोल आणि एल पी जी गॅस सिलेंडर आज शहरात आणण्यात आले. मोठया प्रमाणात पाणी पातळीत घट होत असल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. विस्कळीत झालेले जनजीवन आठवडाभरात सुरळीत होईल, अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यानी आज व्यक्त केली.

पालकमंत्री पाटील यांनी आज सर्व विभागप्रमुख यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पदुम मंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, 1 लाख 48 हजार वीज कनेक्शन सुरु झाले असून अजूनही 1 लाख वीज कनेक्श्‍ान जोडण्यासाठी 150 जणांचे पथक आले आहे. येत्या दोन दिवसात सुरु होतील. 90 पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक शहरात दाखल होत आहे. पुरामुळे आलेल्या कचऱ्यासाठी केमिकल आणून त्याच्यावर मारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी येणार नाही परिणामी तो कचरा लवकर कुजेल.

शिरोळमधील गावांमध्ये केवळ 5 टक्के नागरिक राहिले आहेत. 65 बोटी कार्यरत असून त्यांनाही उद्या हलवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, कनवाड, नृसिंहवाडी या गावात आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 249 गावांमधून 51 हजार 262 कुटुंबातील 2 लाख 47 हजार 678 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 208 संक्रमण शिबीरे आले असून यामध्ये 78 हजार 621 पूरग्रस्तांचा समावेश आहे. महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आठवडाभरात सुरळीत होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom