राष्ट्रवादीच्या नगरसेविका नाजिया सोफी यांचे पद रद्द


मुंबई - मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्र. 78 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका नाजिया अब्दुल जब्बार सोफी यांचे पद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द करण्यात येत आहे. सोमवारी महासभेत तशी माहिती देण्य़ात आली.

नाजिया यांचे पद रद्द होत असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शिवसेनेच्या नेहा खुर्शीद अस्लम शेख (वय 24) यांना विजयी घोषित करण्याची शक्यता आहे. नेहा सध्या बीएचएमएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांच्या प्रमाणपत्रालाही जातप्रमाणपत्र समितीने आक्षेप घेतल्याचे समजते. त्यामुळे त्या जागेसाठी आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने नाजिया यांना 2017 पासूनचे सर्व भत्ते (रक्कम) परत करावे लागणार आहे. नाजिया यांचे पद रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 8 झाली आहे.