मुंबईतील खड्ड्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं


मुंबई - दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांवर आर जे मलिष्काने केलेल्या ‘सोनू तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ या गाण्यावर, ती प्रचंड चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा आर जे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यांवर नवं गाणं तयार केले आहे. मलिष्काने या नव्या गाण्याची झलक माय मलिष्का या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का तिच्या ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय’ या गाण्यानंतर आता ‘चांद जमिन पर’ हे नवं गाणं घेऊन आली आहे.

आर जे मलिष्काने ‘चांद जमिन पर’ हे गाणं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून तिने फेसबुकवरही पोस्ट केले आहे. या गाण्यामुळे आर जे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या गाण्यात मलिष्काने मुंबई महापालिका आणि बांधकाम विभागावर जोरदार टीका केली आहे. दोन वर्षापूर्वी सोनू तुला बीएमसीवर भरोला नाय काय? व गेली मुंबई खड्ड्यात ही पालिकेच्या कामावर उपहासात्मक केलेली गाणी गाजली होती. मलिष्काचे आता ‘चांद जमिन पर’ हे तीसरं गाणं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत हे गाणंही वाजणार आहे.
Tags