युतीची घोषणा आज किंवा उद्या होणार, मित्र पक्ष कमळावरच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2019

युतीची घोषणा आज किंवा उद्या होणार, मित्र पक्ष कमळावरचमुंबई - काल रविवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रविवारी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाले करण्यात आले असून, आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते तर भाजपच्या मित्र पक्षांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना भाजप युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र काल रात्री उशीरापर्यंत नवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाले करण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती असून,आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी युतीची घोषणा करण्यात येणार आहे. स्वबळावर लढल्यास भाजपला किमान १६० जागा मिळतील असे भाजपने केलेल्या चाचणीत स्पष्ट अंदाज वर्तविण्यात आला आहे.भाजप शिवसेनेला जादा जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीवर प्रश्न चिन्ह होते. मात्र पक्षाध्यक्ष अमित शहा हे करण्यासाठी आग्रही असल्याने भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. शिवसेनेला १२६ जागा दिल्याची चर्चा आहे.महादेव जानकर आणि रामदास आठवले यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला असला तरी मित्र पक्षांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह भाजपने धरला आहे.

Post Bottom Ad