आम आदमी पार्टी विधानसभा निवडणुक लढवणार

JPN NEWS
मुंबई - आम आदमी पार्टी ने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढवण्याचे जाहीर केल्यापासून पक्षाकडून निवडणूक लढवायची इच्छा असणाऱ्या शेकडो उमेदवारांचा महाराष्ट्रभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर प्रस्थापित राजकीय पक्षांतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी मिळविण्यासंदर्भात "आप" शी संपर्क केला आहे. तसेच समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांनी अर्ज केले आहेत. लोकांचा हा उत्साह आणि "आप" च्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी पाहून, "आप" च्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं चैतन्य सळसळत आहे असे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. 

आपण गेल्या काही काळातील महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली तर, विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी, कारवाई टाळण्यासाठी , आपले महत्त्व अबाधित राखण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे, त्याचवेळी महाराष्ट्रातील, प्रभावशाली आणि प्रामाणिक नेते "आप" मध्ये येण्यास इच्छुक आहेत. लवकरच यांतील काही मोठे चेहरे "आप" मध्ये आल्याचे दिसून येईल. आम आदमी पार्टीचा हा विश्वास आहे की समाज सशक्त बनवण्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, राजकारण हा सर्वोत्तम पर्याय आहे. नागरिकांना केंद्रस्थानी मानून " आप" ने , राजकारणाच्या माध्यमातून केलेल्या समाजकारणाचे उदाहरण म्हणून आपण दिल्ली राज्यातील आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील सरकारकडे पाहू शकतो. सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करून, येत्या काही दिवसांत " आप" च्या विधानसभा उमेदवारांची, बहुप्रतिक्षित यादी जाहीर करण्यात येईल असे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !