मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण

JPN NEWS

मुंबई, दि. 9 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याचसमोरील भागात भारताचे संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा उभारण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष शेलार, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर, आमदार राज पुरोहित, आमदार प्रकाश गजभिये, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी प्रधान सचिव श्याम तागडे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन, सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे प्रवीण भोटकर, ॲड.राहुल म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या ‘आम्ही जिंकेला संसार’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रसिद्ध चित्रकार आर.टी.कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्कृष्ट तैलचित्र काढल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !