बेस्टकडून दुकानदारांना मिळणार ‘चिल्लर’

मुंबई - गेल्या काही दिवसात बेस्टचं तिकीट कमी झालं आहे. 5 रूपयांपासून याची सुरूवात झाली आहे. अर्थातंच यामुळे बेस्टकडे मोठया प्रमाणावर चिल्लर जमा झाली आहे. यामध्ये 1, 2, 5 आणि 10 च्या नाण्यांचा समावेश आहे. हे जमा झालेले सुटे पैसे व्यापारी, नागरिक, आणि दुकानदारांना देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

बेस्टच्या दरामध्ये कपात होवून 5, 10, 15, 20 असा बदल झाला आहे. त्यामुळे लोकांकडून अनेकवेळा सुटे पैसेच दिले जातात. यात बेस्टकडे मोठ्या प्रमाणात चिल्लर जमा झाली आहे. ही चिल्लर व्यापारी, नागरिक, दुकानदारांना देण्यात येणार आहे. बेस्टच्या सर्व आगारामध्ये ही सुविधा असणार आहे. यामध्ये 10 व 20 रुपयांच्या नोटाही उपलब्ध आहेत. जवळजवळ 10 ते 12 लाखांची नाणी, सुट्टे पैसे दररोज बेस्ट प्रशासनाकडे जमा होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दिवसही ठरवण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस आगारामध्ये ही सोय असून तिकीट व रोख विभागात (रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून) सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा मिळण्याची करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Tags