पंजाब महाराष्ट्र बँकेत वीज बिल भरू नये - बेस्टचे आवाहन


मुंबई - आर्थिक निर्बंध घालण्यात आलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेमधील विज बिल भरणा केंद्रात बिलाची रक्कम भरू नये असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून ग्राहकांना करण्यात आले आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला महापालिकेकडून मदत केली जात आहे. बेस्टच्या विज बिलाची रक्कम विविध बँकांमध्ये जमा केली जाते. ही रक्कम मोठी असते. एखादी बँक बंद झाल्यास ही रक्कम बेस्टला मिळणे शक्य नाही. यामुळे बेस्टचे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते. नुकतेच पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहे. बँकेवरील निर्बंधाची माहिती मिळण्याआधी ज्या वीज ग्राहकांनी बिलाचे पैसे बँकेच्या सायन शाखेत भरले आहेत, ते पैसे लवकरात लवकर मिळवण्यासाठी बेस्ट प्रशासन प्रयत्न करत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.
Previous Post Next Post