धर्माचा उल्लेख करुन प्रस्तावास नकार देणारा कंत्राटदार काळ्या यादीत - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

09 September 2019

धर्माचा उल्लेख करुन प्रस्तावास नकार देणारा कंत्राटदार काळ्या यादीत


मुंबई - एम पश्चिम विभागातील चेंबूर नाका येथील भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर या मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे विस्थापित होणा-या मंडईतील पात्र गाळेधारकांना त्याच भूखंडावर बाजूच्या मोकळ्या जागेवर संक्रमण शिबिरे बांधली जाणार आहेत. तसेच मासळी, मटण विक्रेत्यांसाठी शेडचे बांधकामही केले जाणार आहे. मात्र ही शिबिरे बांधण्याकरीत दिलेल्या कंत्राटदाराने जैन धर्मिय असल्याने प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे धर्माचा उल्लेख करून प्रस्तावाला नकार दिल्याने अशा कंत्राटदारांला काळ्या यादीत टाका असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बुधवारी स्थायी समितीत दिले.

चेंबूरकर मंडई सी- १ कॅटॅगिरीतील असल्याने ही मंडई पाडून पुनर्विकास केला जाणार आहे. मंडईतील परवानाधारक विस्थापित गाळेधारकांना त्याच भूखंडावर संक्रमण शिबिर बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. सदर प्रस्तावानुसार संक्रमण शिबिराचे आराखडे महापालिका वास्तुशास्त्रत्र यांनी इमारत प्रस्ताव विभागाकडून मंजूर करून घेतले आहेत. या प्रस्तावात संक्रमण शिबिरासह मासळी, मटण विक्रेता यांच्याकरीता पत्र्यासह लोखंडी शेडचे बांधकाम करणे, दोन आसनी शौचालये, पाण्याच्या टाकी, पंप हाऊस बांधण्याचे नमूद आहे. यासाठी ८८, ०१,७४२ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने जैन धर्मिय असल्याने सदर काम करण्याकरीता नकार दिला असून तसे प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे नियमानुसार संबंधित कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे हे काम दुस-या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जैन असल्याने हे काम करण्यास उल्लेख करून प्रस्तावास नकार देणा-या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here