पालिका कर्मचार्‍यांची दिवाळी जोरात - १५ हजार सानुग्रह अनुदान - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

19 September 2019

पालिका कर्मचार्‍यांची दिवाळी जोरात - १५ हजार सानुग्रह अनुदान


मुंबई - मुंबई महापालिकेतील कर्मचा-यांच्या बोनसचा प्रश्न विधानसभा निवडणुकीत अडकू नये यासाठी यंदा एक महिना अगोदरच कर्मचा-यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा कर्मचा-यांची दिवाळी जोरात असणार आहे.

पालिकेत सुमारे एक लाख ११ हजार कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचा-यांना पालिकेकडून दरवर्षी दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान दिले जाते. दरवर्षी या सानुग्रह अनुदानात पालिका प्रशासन वाढ करत असते. मात्र यंदा सानुग्रह अनुदानात कोणतेही वाढ न करता गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे . पालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रकच आज जाहीर केले असून कर्मचा-यांच्या आगामी वेतनात ही रक्कम जमा होणार आहे.

यंदा दिवाळीच्या कालावधीत विधानसभा निवडणुका होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पालिका कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करता येत नसल्याने यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने मागील वर्षी प्रमाणेच कर्मचार्‍यांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे.

Post Top Ad

test