मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती

JPN NEWS

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो आज शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीने मंजूर केला आहे. त्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यासाठी आज अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची उचलबांगडी करत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवली होते. मिलिंद देवरा यांनी स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या जागेवर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले.

3 वेळा धारावीमधून आमदार - 
एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळेंनी त्यांचा इथे पराभव केला. त्याआधी 3 वेळा ते धारावीमधून आमदार झाले. त्यांनी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !