
सोमवारी २ सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर गुरुवारी मंगळागौरींचे आगमन झाले. मुसळधार पावसातही भक्तजणांनी मोठ्या हर्षोत्साहात गौराईचे स्वागत केले. गौरी गणपतींच्या भक्तीत भाविक तल्लीन झाले. माहेरवाशीन गौराईला गोडधोडाचा नैवैद्य दाखवून मनोभावे पूजा अर्जा करण्यात आली. गेल्या सहा दिवसापासून बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर शनिवारी भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनसाठी ढोल ताशांच्या गजरात, टाळ- मृदूंगांच्या निनादात वाजत गाजत विसर्जन मिरवणूकीला सुरुवात करण्याचा बेत आखला होता. मात्र जोरदार पावसामुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला. लाडक्या बापाचे विसर्जन भरपावसांत करावे लागले. जोरदार पाऊस असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.