राज्यपाल पदाची भगत सिंग कोश्यारी यांनी घेतली मराठीतून शपथ

Anonymous

मुंबई - महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची मराठीतून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रज्योग यांनी राज्यपाल पदाची शपथ दिली.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

चे. विद्यासागर राव यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केली होती. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील राज भवन येथे शपथ समारोह आयोजित केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रज्योग यांची राज्यपालांचे स्वागत केले. या सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. शपथ मराठीतून घेत असतांना राज्यपाल महोदयांनी घटनेचे संरक्षण करीत स्वतः ला महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देईल असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदाची शपथ घेतली. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार टाळयानी स्वागत केले.यावेळी उत्तराखंड राज्यांच्या काही मंत्र्यांसह राज्यसरकारचे मंत्री, राज्यमंत्री आणि सेना भाजप चे खासदार आमदार मुख्यसचिव, पोलिस महासंचालक,राज्य निवडणूक आयुक्त पोलिस आयुक्त यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.