नरेंद्र मोदी भाषणात उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' म्हणाले

JPN NEWS

मुंबई - नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 'लहान भाऊ' असा उल्लेख केला. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात युतीचा पुनरुच्चार केला. "हे सरकार आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे. पुन्हा युतीचंच सरकार येणार आहे." असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत असताना, आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. 

या दोन्ही गोष्टींवरून राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आलंय. कारण काही दिवसांपूर्वीच अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. त्यामुळं व्यासपीठांवर एक भूमिका आणि पाठीमागून एक भूमिका अशी भाजप-शिवसेनेचं धोरण आहे की, युतीच्या आगामी राजकारणाची बिजं यात आहेत, हे आम्ही तपासून पाहिलं.

मुंबईत मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं. मुंबईतील नवे मेट्रो मार्ग, मेट्रो भवन आणि मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.

मोदींनी उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' का म्हटलं? -
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर कायमच शिवसेना आपण 'मोठा भाऊ' असल्याचं सांगत आलीय. त्यामुळं आता मोदींनी उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' म्हटल्यानं शिवसेनेला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय का, अशी चर्चा सुरू झाली. "अडवाणी कायमच शिवसेनेला उद्देशून म्हणायचे की, 'वो (शिवसेना) राम है और हम लक्ष्मण है.' त्यामुळं एकेकाळी स्वत: भाजपच शिवसेनेला महाराष्ट्रात मोठा भाऊ मानत होती,

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !