PMC च्या खातेदारांना दिलासा


मुंबई - पंजाब नॅशनल बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. यानुसार सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्यास परवानगी देण्यात आली होती. रिझर्व बँकेकडून तसे निर्बंध लादण्यात आले होते. यानंतर बँकेच्या खातेदारांनी चांगलाच आक्रोश केला. यामुळे रिझर्व बँकेने खातेदारांना आता १०,००० हजार रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतून (पीएमसी) खातेदारांना आता 10,000 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवहार नियमित नसल्याचे कारण दाखवत रिझर्व्ह बँकेने असे निर्बंध लादण्यात आले होते. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना निलंबीत करण्यात आलं आहे. या आगोदर 1.000 रुपये काढलेल्यांनाही आता 10.000 रूपये काढायला परवानगी देण्यात आली आहे. आरबीआयच्या या आदेशानंतर बँकेचे 60 टक्के खातेधारक आपले पूर्ण पैसे काढू शकतील. त्यामुळे य़ा बँकेच्या खातेदारांना दिलासा दिला आहे.
Tags