आशिष शेलारांच्या गणपती मंडळाला राज ठाकरेंची भेट

Anonymous

मुंबई - राज्याचे शिक्षणमंत्री आणि भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्या वांद्रे (प) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली आणि गणपतीचे दर्शन घेतले. 

लोकसभा निवडणुकीच्या काळातील राज ठाकरे आणि शेलार यांच्यात झालेला राजकीय वाद सर्वांनाच माहीत आहे. राज ठाकरे ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला आशिष शेलार यांनी त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले होते. तसेच एका कार्यक्रमात हे दोन नेते आले असता आशिष शेलार यांनी राज ठाकरेंकडे पाहून कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. मात्र आज राज ठाकरे यांनी आशिष शेलारांच्या सार्वजनिक मंडळाला स्वत:हून भेट दिली. यासंदर्भातील फोटो आशिष शेलार यांनीच सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. मात्र राज ठाकरे आले त्यावेळी शेलार त्या ठिकाणी नव्हते. राज ठाकरे यांनी दर्शन घेतले आणि लगेच निघून गेले, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.