Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल


मुंबई, दि. ०३ - विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom